HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून जाळपोळ, सुरक्षा व्यवस्था वाढविली

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी आज (५ एप्रिल) आक्रमक पवित्रा घेत गॅस सिलेंडरला आग लावत मालमत्तेची तोडफोड केली आहे. कारागृह दोन बराकच्या दुरुस्तीसाठी कैद्यांना काश्मीर खोऱ्याबाहेर हलविण्यात येणार होते. यावरून कैद्यांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेत कारागृहातील मालत्तेची नुकसान केले.

कैद्यांनी कारागृहातील दोन बराक आणि तुरुंगातील खानावळीलाही आग लावली होती. यामुळे या कारागृहातील परिस्थितीवर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढविण्यात करण्यात आली आहे. काल ( ४ एप्रिल) मध्यवर्ती तुरुंगात तणावाचे वातावरण आहे. कैद्यांनी कारागृहातून अन्य ठिकाणी नेण्यास विरोध सुरू केला होता. यानंतर आज सकाळी कैद्यांनी कारागृहात आग लावत तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जुन्या श्रीनगर भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : निर्भयाच्या आरोपींना २२ जानेवारीला फाशी नाही

swarit

पंतप्रधानांनी राजकीय प्रचारच करु नये, राऊतांनी मोदींना धरलं धारेवर

News Desk

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

News Desk