श्रीहरिकोटा । चांद्रयान – २ मोहिमेचा मुहूर्त अखेर ठरला, २२ जुलै रोजी दुपारी २.४३ मिनिटाने श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणार आहे. चांद्रयानने आकाशात झेप घेतल्यानंतर १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर, ते चंद्राच्या दिशेने रवाना होणार आहे. भारताची अतंराळ संशोधन संस्था इस्रोची महत्वाकांक्षी ‘चांद्रयान-२’ ही मोहीमकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले होते. चांद्रयान १५ जुलैला होणारे प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आले होते.
Chandrayaan-2 launch, which was called off due to a technical snag on July 15, 2019, is now rescheduled at 2:43 pm IST on Monday, July 22, 2019. #Chandrayaan2 #GSLVMkIII #ISRO
— ISRO (@isro) July 18, 2019
लॉन्चिंगच्या जवळपास एक तास आधी व्हेहिकल सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही चांद्रयान-२ चे लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. १५ जुलैच्या मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान चंद्राकडे झेपावणार होते. परंतु लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास ५६ मिनिट आधीच मोहीत स्थगित करण्यात आली.
विशेष म्हणजे दोन महिला शास्त्रज्ञांकडे या मोहिमेची धुरा देऊन ‘इस्रो’ने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-२ ही मोहीम राबवण्यात यश मिळाल्यास अमेरिका, रशिया, आणि चीननंतर प्रगत तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा चौथा देश म्हणून नाव जगभरात ओळखले जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.