नवी दिल्ली | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोडलेल्या ‘चांद्रयान-२’ने प्रवासाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. चांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली असून भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी (१३ ऑगस्ट) रात्री २ वाजून २१ मिनिटांनी गुड बाय करत आता ‘चांद्रयान-२’ने आता थेट चंद्राच्या दिशेने आगेकूच केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.
ISRO (Indian Space Research Organisation): Today (August 14, 2019) after the Trans Lunar Insertion (TLI) maneuver operation, #Chandrayaan2 will depart from Earth’s orbit and move towards the Moon. pic.twitter.com/JWXppWhNr5
— ANI (@ANI) August 13, 2019
चांद्रयान -२ ने पृथ्वीची कक्षा सोडण्यापूर्वी ‘इस्रो’ने ‘ट्रान्स लूनार इंजेक्शन’ हा किचकट टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे. ‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या बाह्य कक्षेत सहज प्रवेश व्हावा म्हणून यानातील लिक्विड इंजिन सुमारे १२०३ सेकंदापर्यंत फायर केले गेले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.