HW News Marathi
देश / विदेश

#Chandrayaan2 : विक्रम लँडरशी क्रॅश लँडिंग झाल्याने संपर्क तुटला | इस्रो

बंगळुरू | चांद्रयान-२ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण जागाचे लक्ष लागले होते. मात्र, भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. यामुळे अनेक भारतीयांची निराशा जाली होती. विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच लूनर क्राफ्ट क्रॅश लँडिंगनंतर पूर्णपणे नष्ट झाल्याचा अंदाज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. पण, विक्रम लँडर आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इस्रोसोबतच संपर्क तुटला होता. हा संपर्क तुटला होता तरी १४ दिवस संपर्क होऊ शकतो असे इस्रो प्रमुख के. सिवन यांनी सांगितले होते.

दरम्यान, ऑटोमॅटिक लँडिंग प्रोग्रॅममध्ये झालेल्या गडहडीमुळे विक्रम लँडरला अपघात झाला असावा, असा अंदाज विक्रमला लँडिंगदरम्यान आलेल्या अपयशचा तपास करत असलेल्या टीमने वर्तवला आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हा संपूर्ण चांद्रयान-२ मिशनचा केवळ ५ टक्के भाग होता. या मोहिमेचा ९५ टक्के भाग म्हणजेच ऑर्बिटर यशस्वीरीत्या चंद्राभोवती फिरत आहे. त्याचे वजन २३७९ किलो असून त्याचा कार्यकाल एक वर्षाचा आहे. या एक वर्षादरम्यान तो चंद्राच्या पृष्ठभागाची अनेक छायाचित्रे आणि माहिती इस्रोला पाठवू शकतो.

“विक्रम लँडर आपल्या पायांच्या दिशेन पडला नसावा असे, निश्चितपणे सांगू शकतो. विक्रमच्या चार पायांचे नुकसान झाले असून त्यांचे पाय वाकले असावेत किंवा त्यांचे नुकसान झाले असावे.” तर विक्रमला आलेल्या अपयशाच्या अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने सांगितले. ”विक्रम चंद्राच्या पृष्टभागापासून दहा किमी अंतरावर असताना अनियंत्रित झाला होता. तसेच चंद्रापासून ३३० मीटरवर असताना त्याचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता.”

या ऑर्बिटरने विक्रम लँडरचे फोटो देखील काढले होते. त्यानंतर इस्रोने लॅण्डर सोबत संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला पण अजून यात यश आले नाही. विक्रम लँडरचे लोकेशन शोधण्यासाठी नासाची देखील मदत घेण्यात आली. नासाच्या ऑर्बिटरच्या मदतीने विक्रम लँडरचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण नासाचे ऑर्बिटर देखील यामध्ये अयशस्वी ठरले आहे.

 

जाणून घ्या नेमके काय घडले

७ सप्टेंबरला शनिवारी १:३८ वाजण्याच्या सुमारास १४७१ किलो वजनाचा विक्रम ३० किमी उंचीवरुन १.६८ किमी-सेकंद वेगाने चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने उतरायला सुरुवात झाली. त्यावेळी सगळे सुरळीत होते. चंद्रावर उतरायला २.१ किमी अंतर उरले होते. १ वाजून ५५ मिनिटांची वेळ झाली असताना इस्रोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क केंद्रावरील स्क्रीनवर विक्रम लँडर आपल्या निर्धारित मार्गावरून थोडासा बाजूला हटल्याचे दिसले. तिथून त्याचा संपर्क तुटला. इसरोच्या अधिकाऱ्यांच्या मते ज्यावेळी खाली उतरत असताना विक्रमचे थ्रस्टर्स बंद केले त्यावेळेस त्याचा संपर्क तुटला असण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! मुंबईतील तब्बल ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

BYJU कडून नीरज चोप्राला 2 कोटींची भेट!

News Desk