HW News Marathi
देश / विदेश

चारित्र्यहनन करुन आरक्षणाच्या मुळ मुद्याला बगल देता येणार नाही- हार्दिक पटेल

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारांमध्ये सोशल मिडीयाचा भाजपने केलेला वापर काही नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत चालली आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या संदर्भातील सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे निवडणूक प्रचाराचा स्तर आणि पद्धत बदलल्याचे चित्र आहे. या व्हिडिओ संदर्भात हार्दिक पटेल यांना विचारले असता तो मी नव्हेच असा दावा हार्दिक यांनी केला आहे. हे संपुर्ण व्हिडीओ प्रकरण भाजपचा डाव असून त्याबाबत वकिलांचा सल्ला घेणार असल्याचं हार्दिक यांनी सांगितले आहे. व्यक्तिगत पातळीवर मी कसाही असेन मात्र पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरचा माझा लढा खरा आहे.

सरकारमध्ये हिमंत असेल तर त्यांनी थेट माझ्याशी पंगा घ्यावा. जर व्यक्तिगत शञृत्व असेल तर मला ठार मारावे असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या या लढ्यामध्ये पाटीदार समाज माझ्या सोबत आहे. त्यामुळे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून आरक्षणाच्या मुळ मुद्याला बगल देता येईल असा भाजपचा भ्रम असल्याचंही हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत थांबलेल्या कर्नाटकातील आमदारांच्या हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Aprna

शंभर वर्षापासून येथे रंगते म्हैशीची शर्यत

News Desk