HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसकडून पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्यानंतर चन्नी सिद्धूच्या पडले पाया

मुंबई | देशात पाच राज्याच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांनी त्या त्या राज्यासाठी त्यांचा मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार दिला आहे. पंजाबसाठी काँग्रेसने काल (६ फेब्रुवारी) मुख्यमंत्री पदाचा दावेदाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून  चरणजितसिंग चन्नी हे मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहेत. चन्नींना मुख्यमंत्री पदाची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर त्यांनी नवज्योत सिंग सिद्धूच्या पाया पडलेले चित्र दिसून आले.

दरम्यान, सिद्धूनने सुद्धा चन्नींच्या हात वर उंचावून विजेय झाल्याप्रमाणे अभिवादन केल्याचे दिसून आले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी चन्नीची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा केल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू आणि चन्नीना मिठी मारली. पंजाबमध्ये चन्नी आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यामुळे नवज्योत सिंग सिद्धू हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर पडले असून आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेसमध्ये कोणीच मुख्यमंत्री बनण्यासाठी आलेले नाही. काँग्रेसमधील नेते हे राज्याला पुढे नेहण्यासाठी आले आहेत. पंजाब काँग्रेसमधून कोणाला एका मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून निवडणे कठीण काम होते. कारण,  चन्नीजी, सिद्धूजी आणि जाखडजी हे सर्वजण काँग्रेसमधील हिरे आहेत. याच्यातील कोणा एकाला मुख्यमंत्री पदासाठी निवडणे हे खूप अवघड होते. त्यामुळे पोल करून राज्यातील जनतेलाच मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठविण्याचे काम दिले.”  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

swarit

न्यायाधीशांची भरती करताना अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्यात यावे !

News Desk

#NirbhayaCase : आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली, दोषींना फाशी अटळ

News Desk