HW News Marathi
देश / विदेश

छगन भुजबळ यांचा जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

मुंबई | राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला आहे. मनी लॉँड्रींग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिल्यानंतर इडीला कोठडी मागण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यानुसार भुजबळ यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, भुजबळ यांनी यापूर्वी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा हा राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे. गेल्या 21 महिन्यांपासून भुजबळ जेलमध्ये आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊँ च्या प्रतिमेने बनवला जागतिक विक्रम

News Desk

आई-वडिलांनी मुलीला चांगले संस्कार दिले तर बलात्कार थांबतील, भाजप आमदाराचे मोठे वक्तव्य

News Desk

#JantaCurfew : टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाही, राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

swarit