मुंबई | “महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे, “, असे विधान ट्वीट कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Basavaraj Bommai) यांनी केले आहे. बोम्मईच्या ट्वीटनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून राजकीय पडसात उमटणार आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील जत तालुक्यांतील 40 गावांवर दावा करण्याचा गांभीऱ्यांनी विचार करत असल्याचे विधान बुधवारी (23 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर राज्यात बोम्मईच्या विधानाचे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
बसवराज बोम्माई ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चिथावणीखोर विधान केले आहे. आणि त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहेत. तर कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे.” बोम्मई पुढे म्हणाले, “2004 पासून महाराष्ट्र सरकारने दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्याला आतापर्यंत यश आले नाही. आणि यापुढेही यश मिळणार नाही. आम्ही कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत”, असे त्यांनी फडणवीसांना सांगितले आहे.
ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇದ್ರ ಫಡ್ನವಿಸ್ ಅವರು ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದು, ಅವರ ಕನಸು ಎಂದೂ ನನಸಾಗುವುದಿಲ್ಲ. ನಾಡಿನ ನೆಲ, ಜಲ, ಗಡಿ ರಕ್ಷಣೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕಟಿ ಬದ್ಧವಾಗಿದೆ.
1/3— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 23, 2022
देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले
“महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकात समावेश करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे”, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी (23 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना केले होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर राज्यातील मंत्र्यांची बैठकीत निर्णय घेतले. सीमा भागातील लोकांना आपण मदत करण्याचे ठरवले आहे. यामुळेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी असे विधान केले असून महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयात लढाई लढवू. बेळगाव-कारवार-निपाणीसह जी आमची गावे आहेत ती सर्व मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
संबंधित बातम्या
सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.