HW News Marathi
देश / विदेश

पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री पर्रिकर विजयी

गोवा : राजधानी पणजीतून पोटनिवडणूक लढवणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे विजयी झाले आहेत. वालपोई मतदार संघातील अन्य निकालाकडेहीसर्वांचे डोळे लागले असून या मतदार संघात भाजपचे विश्वजित राणे आणि काँग्रेसचे रॉय नाईक यांच्यात लढत आहे. येथील दोन मतदारसंघांमध्ये रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली.

तीन राज्यांमधील विधानसभेतील चार जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. गोव्यातील पणजी, वालपोई, दिल्लीतील बवाना आणि आंध्रप्रदेशमधील नंद्याल या चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली.

पणजीमध्ये मुख्यमंत्री पर्रिकर यांना काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत पर्रिकर यांनी चोडणकर यांचा सुमारे ४,८०० मतांनी पराभव केला.

पर्रिकर यांच्या विजयामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. पणजी हा मनोहर पर्रिकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. पणजीत ७० टक्के मतदान झाले होते. या भागातील मतदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

swarit

दहशतवाद्याचे चिथावणीखोर भाषणाचे 25 तास प्रसारण

News Desk

चंद्राबाबूंनी खासदारांना भाजपमध्ये पाठवले | वायएसआर काँग्रेस

News Desk