HW News Marathi
देश / विदेश

भारतात चीनची हेरगिरी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक जणांवर नजर

नवी दिल्ली | भारतामध्ये चीनच्या हेरगिरीबाबत मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनकडून आता केवळ एलओएसीवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कट कारस्थान रचले जात आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चीनकडून भारतातील मोठ्या पदांवरील राजकीय नेते तसेच लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरु असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे १३५० लोकांची हेरगिरी सुरु असल्याची खळबळजनक माहिती येत आहे.

झेन्हुआ या कंपनीने आपण हायब्रीड वॉरफेअरमधील नव्या तंत्रज्ञानाचे जनक असल्याचा दावा केला आहे. आपण चीनच्या पुनरुत्थानासाठी हे करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे झेन्हुआ कंपनीचे चीनी सरकारशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून चीनी सरकार भारतातील प्रमुख व्यक्तींवर पाळत ठेवत असल्याचा दाट संशय आहे. भारत-चीन यांच्यातील सद्य तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत चिंतेची मानली जात आहे.

झेन्हुआकडून पाळत ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री, संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत, १५ माजी लष्करप्रमुख, वैज्ञानिक, उद्योगपती रतन टाटा आणि सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

झेनुआ कंपनी २०१८च्या एप्रिलमध्ये स्थापन करण्यात आल्याची नोंद आहे. कंपनीची जगभरात २० केंद्रे आहेत. चीन सरकार आणि चिनी लष्कर हे कंपनीचे ‘ग्राहक’ असल्याची नोंद आहे. १ सप्टेंबरला कंपनीच्या इमेल पत्त्यावर एक प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यानंतर म्हणजे ९ सप्टेंबरला कंपनीने आपले संकेतस्थळच माहिती महालाजातून (इंटरनेट) काढून टाकले. प्रतिनिधीने ‘झेनुआ’कंपनीच्या शेन्झेन येथील मुख्यालयात जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर एक प्रश्नावली ठेवली होती. त्या प्रश्नावलीत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने काढलेल्या प्रश्नांचाही समावेश होता. पंरतु, हे प्रश्न कंपनीच्या व्यापार गुपिताशी संबंधित असल्याने त्यांची उत्तरे देणे अयोग्य आहे,’ असे उत्तर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर 2 आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

ताजमहालमध्ये बॉम्बच्या अफवेने उडाली खळबळ, एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

सोमनाथप्रमाणे अन्य मंदिरे वेळीच न उभारल्याने दहशतवाद वाढला !

News Desk