मुंबई | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटना (WHO) सोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला मोठी मदत करत असतानाही संघटनेवर संपूर्णपणे चीनचे नियंत्रण असून त्यांच्या बाजुने काम करत असल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.
#WATCH "China has total control over WHO despite only paying $40 million a year compared to what US has been paying which is approx $450 million a year.Because they have failed to make requested&needed reforms today we will be terminating our relationship with WHO": US President pic.twitter.com/4i4DlCHhqc
— ANI (@ANI) May 29, 2020
ट्रम्प म्हणाले, “वार्षिक केवळ ४० मिलियन डॉलर (४ कोटी डॉलर) मदत देऊनही चीनचे जागतिक आरोग्य संघटनेवर नियंत्रण आहे. दुसरीकडे या तुलनेत अमेरिका WHO ला वार्षिक ४५ कोटी डॉलर एवढी मदत करत होती. परंतु आवश्यक उपाययोजना करण्यात अपयश आल्याने आम्ही आजपासून जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध तोडले आहोत.”
“जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणार निधी हा आता जगभरातील इतर आरोग्य संघटनांना मदतीसाठी देणार आहे,” असे ट्रम्प म्हणाल. चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगभरात पसरला. या विषाणूनच्या संसर्गामुळे जागतिक महामारीचे रुप घेतले आहे. या व्हायरसचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. या व्हायरसमुळे जगभरात लाखोच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.