HW News Marathi
देश / विदेश

चिनी सैन्यांची लडाखमध्ये घुसखोरी झाली नाही | भारतीय सैन्य

नवी दिल्ली । चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाखमध्ये भारतीय हद्दीत सहा किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चिनी झेंडा फडकावल्याचे माहिती मिळाली होती. परंतु भारतीय लष्कराने या वृत्ताचे खंडन करत सांगतले की, चिनी सैनिकांकडून घुसखोरी केली नसून ते डेमचोक येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आपल्या हद्दीत येऊन तैनात झाल्याचे स्पष्टीकरण भारतीय सैन्याने दिले आहे.

चिनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत पुन्हा एकदा घुसखोरी केल्याची घटना घडली आहे. चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे. चिनी सैनिक ६ जुलैला लडाखच्या डेमचोक आणि कोयुल परिसरात घुसले होते. त्यावेळी त्यांनी चीनचा झेंडाही फडकवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिबेटचे काही लोक दलाई लामा यांचा ८४ वा जन्मदिवस साजरा करत होते. याचा फायदा घेत चिनी सैनिकांनी हातात तिबेटीयन झेंडे होते. त्यावेळी चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसलेल्यानंर भारतीय सैन्यांनी त्यांचा विरोध केला.

पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान एसयूव्हीमधून प्रवास करत होते. त्यांनी तिबेटच्या शरणार्थींच्या समोर विरोध दर्शवला. सगळा प्रकार घडला, त्यावेळी भारतीय जवानही घटनास्थळी उपस्थित होते. भारतीय जवानांनी चीनी सैनिकांची घुसखोरी रोखली. काही तास त्याठिकाणी थांबल्यानंतर चिनी सैनिक मागे फिरले. चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत दीड किमी पर्यंत घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

२०१६ मध्ये भूतानच्या डोकलाममध्ये चीनने रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर उभय देशांच्या सैन्यांत तणाव शिगेला पोहोचला होता. ७३ दिवस हा तणाव कायम होता व त्यानंतर चीनने रस्त्याचे काम थांबवले. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर असल्याने भारताने याबाबत कडक धोरण स्वीकारले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी, मध्यस्थांमार्फत तोडगा नाही

News Desk

 मग फेसबुक बातम्या सांगणार नाही ? 

swarit

जम्मूमध्ये बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk