HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती खालावल्यानंतर चिराग पासवान यांचे भावनिक पत्र 

पाटणा | लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या उपचारासाठी ICU विभागात हलवण्यात आले आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, रामविलास पासवान यांची प्रकृती खालावल्यामुळे चिराग पासवान यांना बिहारमध्ये जाणे शक्य नाही आहे. या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांचे सुपूत्र चिराग पासवान यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहले आहे.

चिराग पासवान यांचे भावनिक पत्र…

“कोरोना संक्रमण काळात लोकांना रेशन मिळण्यास त्रास होऊ नये, म्हणून वडिलांनी नियमित आरोग्य तपासणी पुढे ढकलली. यामुळे ते आजारी पडले. गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात आहेत.” असे चिराग पासवान यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे

“मुलगा या नात्याने मी वडिलांना रुग्णालयात पाहून खूप अस्वस्थ होतो. वडिलांनी मला बर्‍याच वेळा पाटण्याला जाण्याचा सल्ला दिला, पण मुलगा म्हणून त्यांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मी त्यांच्याबरोबर रहावे अन्यथा तुम्हा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वत:ला कधीही क्षमा करु शकणार नाही” असे भावनिक उद्गार चिराग पासवान यांनी काढले आहेत.

“पक्षाध्यक्ष या नात्याने आपल्याला त्या सहकाऱ्यांचीही चिंता आहे, ज्यांनी आपले जीवन ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’साठी समर्पित केले आहे. आघाडीतील मित्रपक्षांशी बिहारच्या भवितव्याविषयी किंवा जागावाटपाबद्दल आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही.” असेही चिराग यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमांडर अभिनंदन यांच्या मुक्ततेच्या निर्णयाचे अमेरिकेकडून कौतुक

News Desk

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

swarit

16 व्या वर्षात 12 लाख पगार, शिक्षण फक्त 12 वी

News Desk