मुंबई | कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता देशात सर्व उद्योग-धंदे सरू झालेले आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींचा फायदा नागरिकांना मिळण्यासाठी इंधनाच्या किंमतीं कमी कराव्यात, अशी मागणी पत्राद्वारे सोनिया गांधींनी केली आहे. यावर राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील ट्वीट करत केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Congress President Smt. Sonia ji Gandhi writes to the Prime Minister @narendramodi urging the govt to immediately roll back hikes on fuel prices & pass the benefit of low crude oil prices to the citizens. pic.twitter.com/Fp0H64YA8G
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 16, 2020
बाळासाहेब थोरात ट्वीटमध्ये म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंधर दरवाढ त्वरित मागे घ्यावी, असे पत्र लिहिले आहे. आणि कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींचा फायदा नागरिकांना मिळण्यासाठी इंधनाच्या किंमतीं कमी कराव्यात, अशी मागणी त्यांनी ट्वीटमध्ये केली आहे.
सोनिया गांधी पत्रात म्हटले, “केंद्र सरकारने लॉकडाउनच्या दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सुमारे २.६ लाख कोटी रुपयांची वाढ केली आहे. यावेळी लोक कोरोनाच्या संकटात असताना, इंधन दरवाढ होणे म्हणजे नागरिकांना अधिक त्रास देणे आहे. सध्याची परिस्थिती पाहाता लोकांचे संकट कसे दूर करता येईल, हे सरकारचे कर्तव्य असले पाहिजे,” असे पत्रात म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.