HW News Marathi
देश / विदेश

स्टॅलिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

चेन्नई | डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज (७ मे) राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ३३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्यांमध्ये १९ माजी मंत्री आणि १५ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांचाही समावेश आहे.

स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आमदारांना मंत्री बनविण्याच्या आणि त्यांच्या खात्यांच्या वाटपाच्या शिफारशींना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे स्टॅलिन यांचे चिरंजीव उधयनिधी यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. डीएमकेने मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवून प्रचंड विजय मिळवला आहे.

स्टॅलिन यांच्याकडे कोणती खाती आहेत?

स्टॅलिन यांच्याकडे महत्त्वाची खाती राहणार आहेत. त्यांच्याकडे गृह, जनरल अॅडमिनिस्ट्रेशन, स्पेशल इनिशिएटीव्ह, स्पेशल प्रोग्राम इम्पिलमेन्टेशन अँड वेल्फेअर ऑफ डिफरंटली, एबल्ड पर्सन आदी विभाग असणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं चेन्नईचे माजी महापौर एम. ए. सुब्रमण्यन यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. जलसंधारण विभाग डीएमकेचे महासचिव एस. दुरिमुरुगन यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. उधयनिधींचे निकटवर्तीय अनबिल महेश पोयमोजी यांच्याकडे शालेय शिक्षण विभाग देण्यात आला आहे.

राज्यातील डेल्टा क्षेत्रातून कोणताही मंत्री नियुक्त करण्यात आलेला नाही. बुधवारी स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन्याचा दावा केला होता. स्टॅलिन यांनी तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी १३३ जागा जिंकल्या आहेत. त्यांनी काँग्रेससह काही राजकीय पक्षांशी आघाडी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ लाख कोटींच्या नवीन नोटा चलनात- अर्थ मंत्री , अरुण जेटली

News Desk

डॉ. उमर अहमद इलयासी यांनी मोहन भागवत यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख

Aprna

ज्योतिरादित्य सिंधिया ट्विटरच्या बायोमुळे पुन्हा एकदा चर्चत

News Desk