HW News Marathi
देश / विदेश

कोळशावर आधारित उर्जा निर्मिती जानेवारीत 9.2 टक्केंनी वाढली

नवी दिल्ली | भारताचे कोळसा उत्पादन ६.१३% ने वाढून जानेवारी २०२२ मध्ये ७ कोटी ९६ लाख टनांवर पोचले आहे. जानेवारी २०२० मध्ये ते ७ कोटी ५० लाख टन होते. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या तात्पुरत्या माहितीवरून यावर्षी जानेवारीत झालेल्या एकूण कोळसा उत्पादनापैकी, कोल इंडिया लिमिटेडने (CIL) कोळसा उत्पादनात २.३५ % वाढ करत ६ कोटी ४५ लाख टन कोळसा उत्पादन केले आहे.

सिंगरेनि कोलेरीज लिमिटेडने (SCCL) ६ कोटी ३ लाख टन कोळसा उत्पादन घेत उत्पादनात ५.४२% ची वाढ नोंदवली आहे. या कालावधीत कंपन्यांच्या मालकीच्या खाणींनी कोळसा उत्पादनात ४४.९१% एवढी वाढ नोंदवत ९ कोटी ७ लाख टन कोळसा उत्पादन नोंदवले. सर्वात महत्वाच्या ३५ कोळसा खाणींपैकी १४ कोळसा खाणींनी १०० टकक्यांहून अधिक चांगली कामगिरी केली आणि इतर सहा खाणींनीही ८० ते १०० टक्के कामगिरी बजावली. जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये उर्जासंबधित कामांसाठी पाठवलेल्या कोळशाचे प्रमाण १८.७०% नी वाढून ६३.२२ MT वर पोचले. जानेवारी २०२० मध्ये ते ५ कोटी ३२ लाख ६० हजार टन होते.

जानेवारी २०२० च्या तुलनेत कोळशावर आधारित उर्जा निर्मितीने ९.२१%ची वाढ नोंदवली. जानेवारी २०२२ मध्ये एकूण उर्जा उत्पादन जानेवारी २०२० च्या तुलनेत ६.६९% हून अधिक होते. कोविड महामारीमुळे आर्थिक वर्ष २०२१ हे असाधारण वर्ष मानले असल्यामुळे आर्थिक वर्ष २०२० मधील कोळसा उत्पादनाची तुलना करताना आर्थिक वर्ष २०२० मधील कोळसा उत्पादनाच्या आकड्यांचा आधार घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

News Desk

पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतानेच पाडल्याचे वायुसेनेकडून पुरावे

News Desk

जोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२७ लढाऊ विमान कोसळले

News Desk