HW Marathi
देश / विदेश राजकारण

#CoronaVirus : आज मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन, पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली। देशात कोरोनाचा प्रादुर्भावा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मोदींनी आज(२४ मार्च) सायंकाळी ८ वाजता देशावासियांना संबंधित करताना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली.

मोदी म्हणाले की, ‘जनता कर्फ्यून दाखवून दिले की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधन नाहीत, असे नाही. पण, हा आजार इतक्या वेगाने पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एकवीस दिवस अत्यंत महत्त्वाचे. ही साखळी तोडण्यासाठी २१ दिवस अत्यंत महत्त्वाचे, २१ दिवस घराबाहेर पडायचे नाही. देशव्यापी लॉकडाउनने घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मणरेखा आखली गेली, मोदी म्हणाले.

देशभरात जनता कर्फ्यू (२२ मार्च) मिळाले प्रतिसाद बद्दल मोदींनी लहानपणापासून ते वयोवृद्धपर्यंत सर्वांचे आभार मानलेएकवीस दिवस अत्यंत महत्त्वाचे. ही साखळी तोडण्यासाठी २१ दिवस अत्यंत महत्त्वाचे, २१ दिवस घराबाहेर पडाये नाही. देशव्यापी लॉकडाउनने घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मणरेखा आखली गेलीय

Related posts

शिवसेनेने उत्तर प्रदेशासाठी जाहीर केली ५ उमेदवारांची यादी

News Desk

पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देणारा मी कोण ?

News Desk

‘ही’ आहेत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यासह ३ मंत्र्यांची नवी निवासस्थाने

News Desk