HW News Marathi
देश / विदेश

कॉग्रेसने मोदी सरकारकडे केल्या ‘या’ १० मागण्या

नवी दिल्ली | चीनच्या वुहान शहरापासून सुरुवात झालेल्या कोरोनामुळे एक एक करत सपंपूर्ण जग लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. इटलीमध्ये तर दिवसागणिक ४००-५०० जण प्राण गमावत आहेत. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ४०८ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत.

कोरोना रुपी जागतिक संकटावर मात करण्यासाठी काल (२२ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर देशभरतून जनता कर्फ्यूला उत्सफूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला. तसेच, ताळ्या, थाळ्या व घंटानाद करुन देशभरात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या लोकांचे आभार मानत त्यांना प्रोत्साहनही दिले. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काँग्रेसने मोदी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत मोदी सरकारकडे या मागण्या केल्या आहेत.

  • देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांनाच अभिमान आहे. कोरोनाशी दोन हात करताना हे सगळेच अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांना आर्थिक मदत सरकारने दिली पाहिजे. याबाबत सरकारने तातडीने घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
  • देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने रुग्णालयातील व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवावी. देशाची लोकसंख्या 130 कोटी असताना फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स आपल्याकडे आहेत.
  • आरोग्य विभागात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी N95 मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शील्ड, गॉगल्स, हँड कव्हर्स, रबराचे बूट, डिस्पोजेबल गाऊन उपलब्ध करुन द्यावेत जेणेकरुन काम करत असताना कोरोनापासून त्यांचा बचाव होण्यास मदत होईल.
  • देशभरात सॅनिटायझर्स, मास्क आणि लिक्विड यांचा काळा बाजार वाढला आहे. हा काळा बाजार करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे.
  • कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्सची व्यवस्था करण्यात यावी.
  • आतापर्यत फक्त 16 हजार कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढवण्याची खूप गरज आहे.ीही यावे रक्तदान केल्याने कोरोनाचा संसर्ग होतो.
  • लघू आणि मध्यम व्यावसायिकांच कोरोनामुळे मोठं नुकसान झालं आहे . त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.
  • कोरोनामुळे बळीराजावर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच त्रस्त असलेला शेतकरी आणखी त्रस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी.
  • कोरोनामुळे मध्यमवर्गीय लोक, पगारी काम करणाऱ्यांमधील जे लोक EMI भरत आहेत तो स्थगित करावा. जेणेकरुन या वर्गालाही काही प्रमाणात मदत होईल.
  • मजुरी करणारे, असंघटीत काम करणारे कामगारांना देखील केंद्र सरकारने मदतीची घोषणा करवी, अशी मागणी रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रुपये, उत्तर प्रदेश पोलिसांनी ५ जणांना घेतलं ताब्यात

News Desk

युनिटेकच्या चंद्रांना अटक

News Desk

“चक्क राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत संसदेत दाखल”!

News Desk