HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेस उमेदवार अलका लांबांनी ‘आप’च्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावली

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (८ फेब्रुरवारी) सकाळपासून ७० जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडकोठ पोलीस बंदबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील एका मतदान काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी आप कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे टिला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपच्या संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. अलका लांबा त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी टिला परिसरात गेल्या होत्या.

यादरम्यान, आपच्या कार्यकर्त्याने अलका लांबावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर अलका लांबा संतापलेल्या अलका लांबा यांनी आपच्या कार्यकर्त्याच्या दिशेने धाव घेत त्यांच्या कानशीलात लगवल्याची माहिती त्यांनी दिली. लांबांनी कानशीलात लगावलेल्या धर्मेश असे आप कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान, दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) अलका लांबा यांनी मागील वर्षी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 25 वर्षांच्या खंडानंतर त्या स्वगृही परतल्या आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला !

News Desk

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी CBIकडे, बिहार सरकारची मागणी पूर्ण

News Desk

मुंबईत थांबलेल्या कर्नाटकातील आमदारांच्या हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने

News Desk