HW News Marathi
देश / विदेश

भाजपला आणखी एक धक्का, NDAमधून ‘या’ पक्षाचाही काढता पाय

नवी दिल्ली | भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागल्याचे दिसून येत आहे. आधी शिवसेना, नंतर अकाली दल आणि गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता अजून एका पक्षाने भाजपची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे. केरळमधीलकेरळ काँग्रेस (पी. सी. थॉमस गट)ने एनडीएला अधिकृतरीत्या सोडचिठ्ठी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

दिलेल्या आश्वासनानुसार आपल्या पक्षाला कोणतीही जागा देण्यात आली नसल्यामुळं एनडीएची साथ सोडण्यावाचून कोणताच पर्याय उरला नाही, असं म्हणत रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची माहिती केरळ काँग्रेस नेते पी.सी. थॉमस यांनी दिली. केरळ काँग्रेस नेते चेन्निथला यांनी यूडीएफमध्ये आपलं स्वागत केल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळं राजकीय वर्तुळात आता हे एक नवं वादळ आल्याचं म्हटलं जात आहे.

या आधी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे नाराज झालेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तत्पूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेली मैत्री तोडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालदीवचे नवे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह

Gauri Tilekar

ज्ञानवापी प्रकरणावर 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी; वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Aprna

अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्कारानं गौरव

News Desk