HW Marathi
देश / विदेश राजकारण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली। काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना काल (२ फेब्रुवारी) नियमित आरोग्य तपासणीकरिता रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे.

सोनिया गांधी यांना काल सायंकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशाच्या महासचिव प्रियांका गांधी हेदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. सोनिया गांधी यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्या शनिवारी (१ फेब्रुवारी) केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हजर नव्हत्या.

७३ वर्षीय सोनिया गांधी गेली काही वर्षे आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच त्यांनी राजकारणात पुर्वीच्या तुलनेत कमी सक्रीय दिसतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले आणि सोनियांवर पुन्हा एकदा पक्षनेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आली.

Related posts

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk

…तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे | धनंजय मुंडे

News Desk

#Results2018 : भाजपने जनतेचा राग समजून आत्मपरिक्षण करावे !

News Desk