नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपने काँग्रेसला जोरदार झटका देण्याची मोठी तयारी केली आहे. काँग्रेसचा मोठा चेहरा असलेले जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. कंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे जितीन प्रसाद आज भारतीय जनता पक्षात सहभागी होणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. तसेच, जितीन प्रसाद यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
Delhi: Congress leader Jitin Prasada joins BJP in the presence of Union Miniter Piyush Goyal, at the party headquarters. pic.twitter.com/lk07VGygbe
— ANI (@ANI) June 9, 2021
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणतात…
काँग्रेस का एक और हाथ भाजपा के साथ… माजी केंद्रीय मंत्री आणि तीन पिढ्या ज्यांच्या काँग्रेसमध्ये राहिल्या, ते जितीन प्रसाद भाजपमध्ये गेले आहेत. सब का साथ सब का विकास, एक भारत श्रेष्ठ भारत अशा घोषणाही त्यांनी प्रवेशावेळी दिल्या…’ एकेक पान गळावया’ अशी काँग्रेसची स्थिती झाली आहे. भाजपला नावे ठेवण्याऐवजी, काँग्रेसने स्वतः आत्ममंथन केले पाहिजे. पण ते न होता, केवळ मोदी आणि शहा यांच्या नावाने सोशल मीडियावरून बोटे मोडण्याचा विधी पार पाडला जाईल, हे नक्की!, असं मत हेमंत देसाई यांनी मांडलं आहे.
‘आज एक दिग्गज व्यक्ती दुपारी १.०० वाजता भाजपच्या मुख्यालयात पक्षात सहभागी होणार आहे’, असं ट्विट भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलूनी यांनी आज सकाळी केलं होतं. या अगोदर जितीन प्रसाद यांनी ५ जून रोजी सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यामुळेही ते चर्चेत आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.