HW Marathi
देश / विदेश राजकारण

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

नवी दिल्ली। देशभरात होळी साजरा होत असताना मात्र, दुसऱ्या बाजुला मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर १९ आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपविली आहे.

राजीनाम्यानंतर काही वेळापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे हे आज (१० मार्च) सायंकाळी ६ वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ज्योतिरादित्य यांच्यासह १९ आमदारांनी राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपकडून पक्षाकडून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आणि केंद्रात मंत्रिपद देण्यात येणार असल्याची भाजपने तयारी दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ज्योतिरादित्या शिंदेंनी राजीनाम्यानंतर नेमके काय लिहिले

“गेल्या १८ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा एक सदस्य आहे. मात्र,वेगळ आता मला काँग्रेसपासून वेगळे होण्याची वेळ आली आहे. मी माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. गेल्या वर्षभरापासून मी याबाबत विचार करत होतो. आता राजीनामा देत आहे. सुरुवातीपासूनच देशातील नागरिकांची सेवा करणे हे माझे ध्येय आणि उद्देश आहे. पण आता मी हे माझ्या पक्षात करु शकत नाही, असे मला वाटू लागले आहे. त्यामुळे मी आता एक नवी सुरुवात करत आहे. देशाची सेवा करुन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी पक्षातील सदस्यांचे आभार व्यक्त करतो”, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

असे आहे मध्य प्रदेश विधानसभेचे गणित

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत. दोन आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या २२८ वर पोहोचली आहे. काँग्रेसकडे ११४ आमदार आहेत. इथे बहुमताचा आकडा ११५ आहे. काँग्रेसला ४ अपक्ष आणि २ बसपा, १ सपा आमदाराने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ १२२ वर पोहोचले आहे.
दुसरीकडे भाजपकडे १०७ आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाजूचे तब्बल २० आमदार राजीनामा देऊन भाजपला साथ देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात येऊ शकते.

Related posts

तरूणींने ढोंगी बाबाचे लिंग छाटले

News Desk

मी सदैव लोकांबरोबर अन् लोकांसाठी कार्यरत राहीन !

News Desk

आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष भरकटविण्यासाठी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची शहांची खेळी !

News Desk