HW News Marathi
देश / विदेश

पक्षाला मोठ्या बदलांची गरज, सोनिया गांधींना नेत्यांनी २३ लिहिले पत्र

नवी दिल्ली | राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार नेत्यांच्या नाराजीचे सत्र हे सुरूच आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. यानंतरही पक्षात फारसे बदल झालेले नाहीत. पक्ष अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. नाराजीच्या या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधीं यांना पत्र लिहिले आहे. पक्षाला मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली आहे. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.

काय आहेत अडचणी?

१- राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.

२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.

३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.

४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडले आहे.

काय आहेत मागण्या?

१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.

२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात.

३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची.

४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी.

५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.

६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार  

News Desk

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

swarit

अजित पवार -देवेंद्र फडणवींसाचा वाढदिवस एकत्र असला तरी राजकीय सूर एकत्र का नाहीत ?

News Desk