HW News Marathi
देश / विदेश

लोकसभेत कर्नाटकबद्दलच्या चर्चेपूर्वीच काँग्रेसच्या खासदारांचे ‘वॉक आऊट’

नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये सध्या निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आणखीच वाढत चालल्याचे चित्र आहे. कर्नाटकातील या राजकीय अस्थिरतेचे पडसाद लोकसभेतही उमटले. लोकसभेत कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीबाबतच्या चर्चेपूर्वीच काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. इतकेच नव्हे तर काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या कर्नाटक काँग्रेस आमदारांच्या बैठकीला तब्बल १२ आमदारांनी अनुपस्थित दर्शविली. रामलिंगा रेड्डी, डॉ. सुधाकर, रोशन बेग, तुकाराम, अंजली निंबालकर, एमटीबी नागराज, संगमेश्वरा, शिवन्ना, फातिमा, बी. नागेंद्र, राज गौड़ा, रामाप्पा ही या अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची नावे आहेत.

बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या त्या १२ आमदारांपैकी ३ आमदारांनी आजारपणाचे तब्येतीचे कारण दिले आहे. दरम्यान, काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकातील मुख्यमंत्री कुमारस्वामीचे सरकार धोक्यात आले आहे. अवघ्या १३ महिन्यात आघाडीचे सरकार पडणार असल्याचे चित्र शनिवारपासून(६ जुलै) स्पष्ट झाले आहे. आता २ अपक्ष आमदारांनी देखील राजीनामा देऊन भाजपला सर्मथन दिले आहे. अपक्ष आमदार एच नागेश आणि आर शंकर यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिल्या राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता १५ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लढाऊ विमानाला आग, विमानाचे तुकडे तुकडे झाले तरी पायलट बचावला

News Desk

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna