HW News Marathi
देश / विदेश

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रचार करण्यास सुरुवात देखील केली आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, ही टॅगलाइन वापरण्यात येणार आहे. यांची सुरुवात मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंधेरी परिसरात राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचा पोस्टर लावून केली आहे.

संसदेमध्ये शुक्रवारी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावा दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषण करताना ‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’ असे विधान केले होते. या विधानाला काँग्रेस कार्नकर्त्यांनी नवीन टॅगलाइन बनवली आहे. मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अधंरी परिसरात राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळा भेटीचे पोस्टर लावले असून यात ‘फरत से नही, प्यार से जितेंगे’, हे राहुल यांनी हे विधान लिहले आहे.

संसदेतील भाषणा दरम्यान राहुल गांधी असे देखील म्हटले की, माझ्या मनात तुमच्याविषयी क्रोध व द्वेष नाही, कारण मी काँग्रेसी आहे. काँग्रेसमध्ये क्रोध, द्वेषाला जागा नाही. आम्ही भाजपमध्ये ही प्रेमाचे वातावरण निर्माण करु आणि तुम्हाला ही काँग्रेसी बनवू, अशा शब्दात भाषण संपवून राहुल यांनी मोदींना मिठी मारली.

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’ गळाभेटीचा पोस्टर लावला आहे. या पोस्टरद्वारे काँग्रेसने आपली नवीन टॅगलाइनवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रेमळ पोस्टरचे भाजप कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

swarit

#CoronaVirus | कोरोनामुळे युरोपमध्ये राजघराण्यातील पहिला मृत्यू

News Desk

इंधनाच्या किंमतींमध्ये पुन्हा कपात

Gauri Tilekar