नवी दिल्ली | दिल्ली हिंसाचार प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल (२७ फेब्रुवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. या निवेदनातील गोष्टी सोनिया गांधींनी माध्यमांसमोर वाचून दाखविला. या निवेदनातून म्हटले की, “दिल्लीतील हिंसाचार रोखण्यास गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलीस अपयशी ठरले आहे. त्यामुळे शहांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी पुन्हा एकदा मागणी सोनिया गांधींनी केली आहे. तसेच नागरिकांचे जीवन, संपत्ती आणि स्वातंत्र्य अबादित ठेवण्यात यावे, अशी अपेक्षा करत राष्ट्रपतींनी निर्णायक पाऊले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे.”
Dr. Manmohan Singh: We called upon President to suggest to him that what has happened in last 4 days in Delhi is a matter of great concern&a matter of national shame in which at least 34 people have died&200 people are injured, it is a reflection on total failure of Central Govt. pic.twitter.com/KsQSncg45L
— ANI (@ANI) February 27, 2020
दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, “गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत हिंसाचाराने उफाळून उटला आहे. देशासाठी लाजीरवाणी घटना आहे. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आणि गृहमंत्र्यांचे अपयशी आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘राष्ट्रपतींना आम्ही विनंती केली आहे की, त्यांनी सरकारला राजधर्माचे पालन करण्यासाठी सांगावे.” राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.
दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, यमुना विहार, भजनपुरा, चांद बाग, शिव विहार या ठिकाणांवर हिंसाचाराचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, ‘बुधवारी (२७ फेब्रुवारी) संध्याकाळपासून हिंसाचाराची कोणतीही घटना समोर आलेली नाही. पोलिसांनी आतापर्यंत १८ एफआयआर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये दाखल केले आहेत. आतापर्यंत हिंसा पसरवणाऱ्यांमध्ये ज्या आरोपींची ओळख पटली आहे अशा १०६ जणांना अटक करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.