HW News Marathi
देश / विदेश

सततच्या निवडणुकीमुळे संसदेचे अधिवेशन आणि चर्चा प्रभावित; ‘वन नेशन वन इलेक्शन’ पंतप्रधानांकडून इशारा

नवी दिल्ली | “सततच्या निवडणुकीमुळे संसदेच्या अधिवेशन आणि चर्चा प्रभावित होत आहे. निवडणुका या होतच राहतील, आणि मी सर्व खासदारांना सांगू इच्छितो की, संसदेत चर्चा करून देशाला प्रगतीकडे नेण्यास मदत करावी, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ इशारा केल्याचे दिसून आले. यावेळी मोदी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३१ जानेवारी) सुरू झाले. असून उद्या (१ फेब्रुवारी) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

मोदी म्हणाले, “या अधिवेशनात चर्चा, मुद्दे आणि खुल्या विचारांसाठी चर्चेचा महत्त्वाची संधी बनू शकते. मी सर्व खासदारांना सांगू इच्छितो की, राजकीय पक्षांनी खुल्या चर्चा करून देशाला प्रगतीकडे नेण्यास मदत करावी.  तसेच निवडणुका त्यांच्या जागी आहेत, तर निवडणुका होतच राहतील. पण देशाचे अर्थसंकल्प अधिवेशन हे वर्षभराची ब्लू प्रिंट तयार करते. यामुळे सर्वांनी अधिवेशनात चर्चेसाठी हजर राहणे गरजेचे आहे.”

देशात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मी तुमच्या सर्वांचे संसदेच्या अधिवेशनात स्वागत करते. देशाची लसीकरण मोहिम, देशात तयार झालेल्या वॅक्सिनचा संपूर्ण जगभरात आपला डंका वाजविला आहे. देशात तयार झालेल्या वॅक्सिनबाबत एक विश्वास तयार झाला आहे. भारताच्या वॅक्सिनबाबात जगभरात एक विश्वास निर्माण झाला आहे. 

संसदेत याविषयावर चर्चा होण्याची शक्यता

गेल्या काही काळापासून देशात महागाईचा दरत वाढली आहे. २०२१मध्ये डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५९ टक्के आणि घाऊक महागाई दर१३.५६ टक्के इतका आहे. पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाच्या खरेदीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात हा मुद्द्यावर चर्चा होणार असून यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारे धरतील. तसेच संसदेत शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारी, चीनची घुसखोरी आदी विषयांवरही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमान चुकून पाडल्याची लष्कराची कबुली

swarit

देशात महागाई स्थिर, सर्वत्र परिवर्तन सुरू | मोदी

swarit

#PulwamaAttack : कोणीही पाकिस्तानला धमकावू शकत नाही | पाकिस्तान

News Desk