नवी दिल्ली | कोरोना लसी संदर्बाभात मोठी बातमी समोर येत आहे. येत्या १० दिवसांत देशात लस देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना वॅक्सिन वापरण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर १० दिवसानंतर ही लस देता येऊ शकते, आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातील विविध राज्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे 3 जानेवारी रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवाक्सिन’ यांना आपत्कालीन परिस्थितीत लसीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.
We are prepared to roll out vaccine within 10 days of emergency use authorisation approvals. The final call will be taken by the government: Union Health Secretary Rajesh Bhushan
DGCI gave approval to two vaccines on January 3 pic.twitter.com/g6sWMsX4cG
— ANI (@ANI) January 5, 2021
दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या कमी होऊन 3 टक्क्यांच्या खाली आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या अडीच लाखांवर आली आहे. त्यापैकी केवळ 44 टक्के रुग्ण रुग्णालयांमध्ये आहेत तर 56 टक्के घरात क्वॉरंटाईन आहेत, जी असिम्प्टोमॅटिक किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. गेल्या आठवड्यात भारतात प्रति लाख लोकसंख्येमध्ये केवळ 96 रुग्ण आढळले, तर दर 10 लाखांमागे एक मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.