HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजारांच्या पुढे नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ कोरोना रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

 

दरम्यान गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख १३ हजार ६५८ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ जणांचा लसीकरण झालं आहे. १५ एप्रिलपासून भारतात दोन लांखाहून अधिक रुग्ण आढळत असून तीन लखांहून अधिक रुग्ण आणि दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला २० कोटी लसींची गरज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदार पुनावालांशी चर्चा

News Desk

अजित पवार,टोपे साहेब साताऱ्यात या,कोरोना नियंत्रणात आणा – शिवेंद्रराजे भोसले

News Desk

महाराष्ट्रात एकाचं दिवसात १००८ रूग्ण ,एकट्या मुंबईत ७५१ रूग्ण

News Desk