HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासांत ६२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

नवी दिल्ली | भारतात दिवसागणिक आणि तासागनिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेले अनेक दिवस रोज ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या आता तब्बल ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, देशात आतापर्यंत १३ लाख ७८ हजार १०६ जण कोरोनामुक्ता झाले आहेत. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात ४१ हजार ५८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला   

News Desk

लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही ! राष्ट्रवादीची केंद्रावर तीव्र नाराजी

News Desk

“तू इतरांची काळजी घेतोय, मात्र स्वतःचीही काळजी घे”, शरद पवारांचा निलेश लंकेना फोन

News Desk