HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ३८,१६४ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर सुरू असताना गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधित रूग्णांसह कोरोनाने बळी जाणाऱ्यांच्या आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार १६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत असल्याने देशाची चिंता दूर झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत एकूण ३८ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ कोटी ११ लाख ४४ हजार २२९ वर पोहचली आहे.

देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ३ कोटी ११ लाखांच्यावर असली तरी सध्या देशात फक्त ४ लाख २१ हजार ६६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर देशात कोरोनाने बळी गेलेल्यांचा आकडा हा ४ लाख १४ हजारांवर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात ३ कोटी ३ लाख ८ हजार ४५६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून ते घरी परतले आहेत.देशात आत्तापर्यंत ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्राची स्थिती काय?

राज्यात ९००० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ५७५६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५९,८०,३५० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,०३,४८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.२४% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….तर मी आताच राजीनामा देईन ! संभाजीराजेंचा मोठा इशारा

News Desk

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राकडून ‘गरीब कल्याण रोजगार योजना’, २५ हजार मजुरांना मिळणार लाभ

News Desk

प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याऐवजी आता तोंडी परीक्षा ! विद्यापीठांकडे ‘हे’ ३ पर्याय

News Desk