HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासांत ६२ हजारांच्यावर नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६२,२५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात लागण होण्याचा हा या वर्षातील उच्चांक आहे. १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे. शुक्रवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

कालच्या (२६ मार्च) तुलनेत देशात आज (२७ मार्च) रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबत देशात गेल्या २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे. याशिवाय ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचं लसीकरण झालं आहे.

कोरोना रुग्णांची महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात आज दिवसभरात ३६,९०२ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण १७,०१९ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चारर्ज देण्यात आला आहे. आजची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत २३,०००,५६ रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.२ टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे एकूण ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६,३७,७३५ वर पोहोचला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘म्युकर मायकॉसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार | राजेश टोपे

News Desk

अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्यात पळवला, विदर्भावर अन्याय केला !

News Desk

देशात एकाच दिवसात ६४ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk