HW Marathi
देश / विदेश राजकारण

दिल्लीच्या चांदनी महल भागातील १३ मशिदीमध्ये राहणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ कोरोना पॉझिटिव्ही

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील चांदनी महल भागात १३ मशिदीत राहणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ जण कोरोना  पॉझिटिव्ही आढळून आले आहेत. यापैकी काही लोकांना मागील महिन्यातील निझामुद्दीन येथील तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यीच माहिती मिळली आहे. दिल्लीमधील चांदनी महल हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानी दिली आहे.

गेल्या चार दिवसांत दिल्लीत तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच चांदनी महल परिसरातील तेरा मशिदींमध्ये १०२ लोक राहत असल्याचे आढळून आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्यापैकी ५२ जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.

यामुळे आता दिल्ली सरकार चांदनी महल भागाचे निजर्तुंकीकरण करण्यात येत असून धार्मिक संस्थांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक राहत असल्याने त्या भागांत कटोंमेंट राबवण्याची तयारी सुरू केली असून ज्या तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. त्या भागांतून कोणलाही बाहेर पडण्याची परवानगी दिली जात नाही.

 

 

 

Related posts

वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल, थोड्याच वेळात पोहरादेवीसाठी रवाना होणार

News Desk

मोक्याच्या ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणण्यात आलं, यामध्ये बदलीच्या कायद्याचा भंग झाला- चंद्रकांत पाटील

rasika shinde

‘विरोधी पक्ष नेते दिल्लीत जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका’, राऊतांचा फडणवीसांना टोला  

News Desk