HW News Marathi
देश / विदेश

भारतातील सगळ्यात ‘कमी’ वयाच्या मुलाला कोरोनाची लागण

नवी दिल्ली | देशभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. वुहानमधून सुरुवात झालेल्या या रोगाने भारतातही आगमन केले आणि एकामागून एक संशयित आणि लागण झालेल्यांची यादी वाढत गेली. कोरोनाची लागण झालेल्यांच्या यादीत केरळमधील तीन वर्षांच्या मुलामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला हा भारतातील सर्वात कमी वयाचा रुग्ण आहे.

७ मार्च रोजी इटलीहून हा मुलगा दुबईमार्गे भारतात आला होता. कोची विमानतळावर तपासणी करणाऱ्या पथकाला मुलाला हलका ताप असल्याचे आढळले. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाचे नमुने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची खात्री होताच ही माहिती मुलाच्या वडिलांना रुग्णालयात स्वतंत्रपणे निरीक्षणाखाली ठेवले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘चीनमधून केरळला परतणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संशय असलेल्या रूग्णांचे सरासरी वय ४० ते ४५ वर्षांच्या दरम्यान आहे.’

गेल्या २४ तासांत केरळमध्ये कोरोना संसर्गाची पाच प्रकरणे आढळली आहेत. त्या पाच जणांपैकी तीन जण इटलीहून परतले होते. परंतु त्यांची तपासणी करण्यास तपास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत, त्यातील बहुतेक विद्यार्थी मागील महिन्यात चीनमधून परतले विद्यार्थी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेगॅससचे खरे बाप देशातच, केंद्राच्या संमतीशिवाय असा सायबर हल्ला होऊ शकत नाही!

News Desk

शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर मणी सी कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी

News Desk

विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ईव्हीएममध्ये मोठा बदल

News Desk