HW News Marathi
Covid-19

जगभरातून कोरोना व्हायरस कधीच जाणार नाही, WHOच्या अधिकाऱ्याचे मोठे वक्तव्य

मुंबई | संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासा जग झुंज देत आहे. मात्र, जगभरातून कोरोना व्हायरस हा कधीच जाणार नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्यया आरोग्य आपात्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख मायकल जे रेयान म्हणाले.

मायकल जे रेयान म्हटले, ‘कोरोना व्हायरससंदर्भात सांगता त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. की, HIV चा विषाणू जगात आजही अस्तित्वात आहे. काहीसे त्याप्रामाणे कोरोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही’ असे त्यांनी सांगितले. पण ज्या लोकांन कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना यातून कसे वाचवायचे यांचा मार्ग आपण शोधायला हवे. आणि कोरोना संदर्भातील वास्तव्याचा आपण स्वीकार कारायला हवा, असे रायन म्हणाले.

गेल्या वर्षी चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरसचा उगम झाला. हा व्हायरस जगभरात पसरला गेला असून आता जगभरात ४४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप एकही औषध उपलब्ध नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक! देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट

News Desk

राज्यात आज ३३०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर १३१५ जणांना डिस्चार्ज

News Desk

देशातील रिकव्हरी रेट वाढून ४९.२१ वर पोहोचला। आरोग्य मंत्रालय

News Desk