HW Marathi
देश / विदेश राजकारण

#CoronaInMaharashtra | राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १२२ वर

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकड्यात आता ६ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे, राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा ११६ वरून १२२ वर पोहोचला आहे. या ६ नव्या रुग्णांपैकी ५ रुग्ण हे मुंबईत तर १ रुग्ण ठाण्यात आढळून आला आहे. याआधी आज (२५ मार्च) सकाळी सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील एकूण ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. आधी या कुटुंबातील ४ जणांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य ५ जणांचे रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तर मुंबईत देखील ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबद्दलची माहिती दिली होती.

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 

मुंबई – 51
पिंपरी चिंचवड – 12
पुणे – 19
नवी मुंबई – 5
कल्याण – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
सांगली – 9
अहमदनगर – 3
ठाणे – 3
सातारा – 2
पनवेल- 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
वसई-विरार – १

राज्यातील एकूण आकडा १२२

Related posts

ट्रम्प अध्यक्ष होताच एकाची आत्महत्या

News Desk

राष्ट्रवादीचा नवा गेम प्लॅन, माढ्यातून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी ?

News Desk

मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही !

News Desk