HW News Marathi
देश / विदेश

#CoronaLockdown : कामगार, मंजूर यांचे स्थलांतर थांबविण्याचे राहुल गांधींचे सरकारकडे आवाहन

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग देशात दिवसेंदिवस वाढत जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉडाऊनची घोषणा केली आहे. यानंतर देशातील सर्व उद्योगधंदे, व्यवसाय आणि काराखाने देखील २१ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे दिल्ली, मुंबई यासारख्या शहरात कामासाठी आलेल्या रोजंदारीवर कामकरणारे कामगार, मंजूर यांना मोठा फटका बसत आहे. तसेच देशातील वाहतूक सेवा ठप्प असल्यामुळे हे सर्वजण हजारांच्या संख्येने आपल्या गावाकडे जाण्यासाठी पायी निघाले आहे. मात्र, या कठिण प्रसंगीत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वटी करत त्यांची व्यथा मांडत केंद्र सरकारकडे मदतीचे आवाहन करत निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, या भयकर परिस्थितील सरकार जबाबदार आहे. देशातील नागरिकांची ही अवस्था करणे ही सर्वात मोठा अपराध आहे. आज संकट प्रसंगीत देशातील बंधू-भगिनींना कमीत कमी सन्मान आणि सहार मिळाला पाहिजे. मोठे संकट ओढविण्या आधी सरकार याबद्दल लवकरता लवकर मोठे पाऊल उचलेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तसेत राहुल गांधींनी दुसरे ट्वीट की, “आज आपल्या रस्त्यावर आपलेच बंधू-भगिनी कुटुंबासह आपल्या गावाकडे पायी निघाले आहेत. कठीण काळात तुमच्यापैकी जो कोणी त्यांना अन्न, पाणी, निवारा देऊ शकेल, मदत करु शकेल, अशा लोकांनी कृपया ती करावी.” तसंच त्यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ८७३ एकूण रुग्ण आहेत. त्यापैकी उपचारानंतर ७९ रुग्ण बरे झाले आहेत तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाढता धोका पाहता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबरला भारत बंद

News Desk

२४ तास ऑक्सिजन निर्मिती, वाहतूक करा, पंतप्रधानांचे आदेश

News Desk

“राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी होतील,” नाना पटोलेंचा विश्वास

Aprna