HW Marathi
देश / विदेश मुंबई राजकारण

#CoronaVirus | ३१ मार्चपर्यंत भारतीय रेल्वे बंद !

दिल्ली | कोरोनाला रोखण्यासठी रेल्वे प्रशासनाने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. देशाची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. केवळ माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे सुरु राहतील. मर्यादित प्रमाणात लोकल सेवा सुरु राहणार आहे. कोलकाता मेट्रोही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी याआधी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी ३१ मार्चपर्यंत सामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र आता रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता देशातील सर्व रेल्वे सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवास करणे टाळा असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतून प्रवास केलेले १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे

Related posts

‘कोरोना’मुळे ५६ वर्षीय हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू, पोलीस दलातील तिसरा बळी

News Desk

अरविंद केजरीवाल घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

अपर्णा गोतपागर

अल्पवयीन मुलावर १५ मित्रांकडून लैंगिक अत्याचार

News Desk