HW News Marathi
Covid-19

कोरोना विषाणूची साखळी नैसर्गिकरित्याच तयार झाल्याचा WHO चा दावा 

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी असे विधान केले होते की कोरोना हा विषाणू चीनमध्ये तयार केला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या विधानाला जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभाग प्रमुख डॉक्टर मायकल रायन यांनी खोडून काढले आहे. त्यांनी असे ठामपणे सांगितले आहे की, हा कोरोनाचा विषाणू नैसर्गिकरित्या तयार झाला आहे त्याला कोणीही तयार केले नाही आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने अनेक तज्ज्ञांशी बातचीत केली आणि त्यानंतर कोरोना विषाणूच्या गुणसुत्रांची साखळी तपासली. ती नव्याने तयार झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता या विषाणूला पाठबळ कुठून मिळत आहे हे शोधणे महत्वाचे आहे असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपने मराठा आरक्षणविरोधातील लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली”, काँग्रेसचा गंभीर आरोप

News Desk

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे !

News Desk

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढला लॉकडाऊन

News Desk