HW News Marathi
देश / विदेश

तुमच्या बलिदानाची किंमत म्हणून काश्मीरला स्वातंत्र्य मिळवूनच देऊ !

नवी दिल्ली | “तुमचे बलिदान वाया जाणार नाही. तुमच्या या बलिदानाची किंमत म्हणून काश्मीरला स्वातंत्र्य मिळवूनच देऊ. आता तो दिवस फार दूर नाही ज्या दिवशी काश्मीरला स्वातंत्र्य मिळेल,” असा दावा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने केला आहे. पुलवामामध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हाफिज सईदने एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडिओत त्यांनी दहशतवाद्यांनी उद्देशून वक्तव्य केले आहे. याचसोबत त्याने भारतासोबत युद्ध पुकारणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

पुलवामामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर काश्मीरमधील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ७ नागरिकांचा मृत्यू झाला. याच परिस्थितीचा फायदा घेत हाफिज सईदने व्हिडीओद्वारे हाफिज सईदने काश्मीरमधील लोकांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

News Desk

मला महाराष्ट्र आवडतो !, कंगना राणावतचा पुन्हा यु-टर्न

News Desk

परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स

News Desk