HW News Marathi
Covid-19

भारताने कोरोनाविरुद्ध तयार केलेल्या Covaxin लसीचे मानवी प्रयोग सुरू !

नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे त्यावरील लस कधी येणार यांच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत. अशातच आता भारतातील पहिली कोरोनाविरुध्ची लस Covaxin तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर समवेत मानवी चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. या पहिल्या टप्प्याच्या चाचणीत देशातील १४ शहरांमधे १,५०० वोलेंटीयर्स यांना सहभागी करून घेणार आहेत.

दरम्यान, या टप्प्याचे सेफ्टी अँड स्क्रिनिंग असे नाव देण्यात आले असून या टप्प्यात लसीचा कोणता दुष्परिणाम होणार तर नाही ना आणि कोरोनावर कसा याचा परिणाम होणार हे पहिले जाणार आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या ट्रायलमध्ये या लसीचा डोस कमी प्रमाणात देण्यात येणार आहे. तसेच यात वोलेंटीयर्सची अँटीबॉडी टेस्ट देखील केली जाणार आहे. ज्यावरून भविष्यात त्यांना कोरोना संक्रमणाचा किती धोका आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे. आणि त्यानंतरच त्यांना चाचणीत सहभागी करायचे की नाही हे ठरवले जाणार आहे.

देशातील १४ शहरांमधे या चाचणीला सुरुवात करण्यात आला आहे. पाटणा येथे १८-५० या वयोगटातील १० वोलेंटीयर्सची निवड करण्यात आली आहे. आधी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यानंतर २-३ तास डॉक्टर त्यांना देखरेखीखाली ठेवणार आहे. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल आणि पुढचा लसीचा डोस त्यांना १४-१५ दिवसांनी देण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मॉल्स वगळता इतर दुकानांना लॉकडाऊनमधून सूट, केंद्राचा मोठा निर्णय

News Desk

देशभरात अनेक ‘बडे लोग’ बोगस डिग्री घेऊन राजकारणात वावरत । सामना

News Desk

लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तो मान्यच, पण….! । अमृता फडणवीस

News Desk