HW Marathi
Covid-19 देश / विदेश

कोव्हॅक्सिन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

मुंबई | देशात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आशतच कोरोनावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. भारतात भारत बायोटेक आयसीएमआरसोबत एकत्र येऊन करोनावरील लस विकसित करत आहे. काही दिवसांपूर्वी या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. त्यानंतर आता भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. भारत बायोटेकनं ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती मागील महिन्यात भारत बायोटेककडून देण्यात आली होती. दरम्यान, आता २६ हजार स्वयंसेवकांवर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आल्याचंही भारत बायोटेकनं म्हटलं आहे. यासंदर्भात बेवसाईटची एक लिंकही भारत बायोटेकनं शेअर केली आहे. कंपनीनं ऑक्टोबर महिन्यात डीजीसीआयकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती.

 

Related posts

शशिकला यांच्याविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे- डी. रुपा

News Desk

मरकजवाल्यांना गोळ्या घालुन ठार मारलं पाहिजे,राज ठाकरे कडाडले !

News Desk

इंधन दरात आज देखील घट कायम

Shweta Khamkar