HW News Marathi
देश / विदेश

कोविड -१९ विरुद्धच्या लढ्यात नागरी प्रशासनाच्या बरोबरीने सैन्य दलही सहभागी

मुंबई | कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी, गरजूंना वैद्यकीय आणि इतर सहाय्य करण्यासाठी सैन्य दल अथक काम करत आहे. या खडतर काळात नागरी प्रशासनाच्या समवेत लष्कराने आपल्या वैद्यकीय सेवा तैनात केल्या आहेत. मुंबई, जैसलमेर,हिंडन, जोधपुर,मानेसर आणि चेन्नई या सहा ठिकाणी लष्कर विलगीकरण सुविधा देत आहे. यामध्ये 1737 जणांना ठेवण्यात आले, त्यापैकी 403 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय अशा 15 सुविधाही लष्कराने सज्ज ठेवल्या आहेत.

केवळ कोविड-१९ साठी समर्पित अति दक्षता विभाग, हाय डीपेडन्सी युनिटसह इतर सुविधा, लष्कराच्या देशभरातल्या ५१ रुग्णालयात तयार ठेवण्यात येत आहेत. कोलकत्ता,विशाखापट्टनम,कोची,बेंगळूरू,कानपूर,जैसलमेर,गोरखपूर इथेअशा सुविधा आहेत. कोविड-19 चे निदान करण्यासाठीच्या चाचण्या करू शकतील अशा लष्कराच्या पाच प्रयोगशाळा राष्ट्रीय ग्रीड मधे सहभागी करण्यात आल्या आहेत. दिल्ली, बंगळूरू,पुणे,लखनौ आणि उधमपूर इथे या प्रयोगशाळा असून यामध्ये आणखी सहा रुग्णालयांतल्या प्र्योगशाळांची भर पडणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांनी परदेशात अडकलेल्या लोकांची सुटका केली तसेच वैद्यकीय सहाय्यही केले. ए सी -१७ ग्लोबमास्टर ३ द्वारा चीनला १५ टन वैद्यकीय सहाय्य पुरवले आणि परतताना ५ बालकांसह १२५ भारतीय नागरिक आणि मित्र राष्ट्रांच्या काही नागरिकांना आणले. त्याचबरोबर दुसऱ्या एका फेरीत इराणमधे अडकलेल्या 58 भारतीयांची सुटका केली.कोविड-१९ च्या तपासणीसाठी ५२९ नमुनेही या विमानाने आणण्यात आले.

सुपर हर्क्युलस विमानाने मालदीवला ६.२ टन औषधे पुरवली. भारतीय हवाई दलाच्या विमानांचा ताफा, आवश्यक वस्तू, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांची ने- आण करण्यासाठी उपयोगात आणण्यात येत आहे. आतापर्यंत देशाच्या विविध भागात सुमारे ६० टन वजनाचा साठा पोहोचवण्यात आला आहे. २८ विमाने आणि २१ हेलीकॉपटर देशाच्या विविध भागात सज्ज ठेवण्यात आली आहेत. शेजारी राष्ट्रांच्या मदतीसाठी नौदलाची सहा जहाजे सज्ज ठेवण्यात आली आहेत. मालदीव, श्रीलंका,बांगलादेश,नेपाल,भूतान आणि अफगाणिस्तान इथे तैनात करण्यासाठी पाच वैद्यकीय पथकेही सज्ज आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे.पी.नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

swarit

निवडणुकीत गुन्हेगार नेत्यांवर बंदी ?

swarit

टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करीत पोलिसांनीच केली लुटालूट

News Desk