नवी दिल्ली | देशातील कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही आहे. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असतानाच्या काळात देशात पहिली विधानसभा निवडणूक बिहारमध्ये होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे तारीख आज (२५ सप्टेंबर) केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. कोरोना काळात होणाऱ्या निवडणुकीची एकूण प्रक्रिया आयोगानं स्पष्ट केली असून, विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आयोगानं खास व्यवस्था केली जाणार आहे.
ज्या कोरोना रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
#COVID19 patients who're quarantined will be able to cast their vote at the last hour of the day of poll, at their respective polling stations, under the supervision of health authorities. This is beside the option of postal facility already extended to them: CEC. #BiharElections pic.twitter.com/hTW1wE4sgI
— ANI (@ANI) September 25, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ३ टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबर पहिल्या टप्प्यातील, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात व ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. करोना पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक होत असून, केंद्रीय निवडणूक आयोगानं करोना रुग्णांना मतदानापासून राहावं लागू नये म्हणून विशेष व्यवस्था केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.