HW News Marathi
Covid-19

१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सूरू होणार, केंद्राने जारी केले नियम

नवी दिल्ली | देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कोरोना योध्याना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती दिली आहे.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसंच स्तनपान करणाऱ्या मातांचं लसीकरण करु नये असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने यावेळी लसीची अदलाबदल केली जाऊ नये असं स्पष्ट सांगितलं आहे. पहिला डोस ज्या लसीचा देण्यात आला होता त्याच लसीचा डोस दुसऱ्या वेळी दिला जावा असं केंद्राने नमूद केलं आहे. औषध नियामकाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली असून २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागणार आहेत.

ज्यांना करोनाची लागण झाली होती त्यांच्यासाठी प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. करोनाची लक्षणं असणाऱ्यांचं, प्लाझ्मा थेरपी झालेल्यांचं तसंच इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्यांचं लसीकरण चार ते आठ आठवड्यांसाठी स्थगित करावं लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑफिसात ५० टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना, राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी

News Desk

ICMR कडून लस आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यांचा प्राधान्याने विचार केला जाणार !

News Desk

वीकेंड लॅाकडाऊनमध्ये काय सुरू ,काय बंद ? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

News Desk