HW Marathi
देश / विदेश

विशाखापट्टणम येथे क्रेन कोसळून १० जणांचा झाला मृत्यू

विशाखापट्टणम | विशाखापट्टणम येथे आज (१ ऑगस्ट) एक भलीमोठी क्रेन कोसळल्याने त्याखाली चिरडून १० मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. विशाखपट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये आज या क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना काही अधिकारी आणि ऑपरेटर्स त्याची पाहणी करीत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

 

या घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ६ मृतदेह या क्रेनखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. डीसीपी सुरेशबाबू यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Related posts

कोटाहून विद्यार्थ्यांना आणण्यास एसटी सज्ज, पण राज्य शासनाकडून आदेश नाही

News Desk

पीटीआयचे सत्ता स्थपानेसाठी १५८ इतके संख्याबळ

अपर्णा गोतपागर

EVMHacking : ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित !

News Desk