HW News Marathi
देश / विदेश

सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे’ – अरुण जेटली

मुडीजच्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या मानांकनात सुधारणा, अहवालाच्या प्रसिद्धीनंतर अरुण जेटलींची विरोधकांना टोलेबाजी

आर्थीक विश्वातील अग्रगन्य समजल्या जाणाऱ्या मूडीजया संस्थेने आपला अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालानुसार भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये‘Baa3’ वरुन ‘Baa2’ हे मानांकन देण्यात आले आहे. तब्बल १३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या मानांकनामध्ये सुधारणा झाली आहे. या अहवालाच्या प्रसिद्धीनंतर देशाचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. नोटाबंदीच्या आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे या शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. मुडीज या संस्थेकडून जगभरातल्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करुन मानांकन देण्यात येते.सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. यामुळे अर्थव्यवस्था पारदर्शक झाली. अनेकजण कॅशलेस व्यहारांकडे वळले. सरकारने अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे. जागतिक पातळीवर नोटाबंदीच्या निर्णयाची सकारात्मक दखल घेण्यात आली आहे,’असे जेटली यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ | अजित पवार

News Desk

भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार ?

News Desk

“ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण तो त्यांच्याच हातात फुटला”, संजय राऊतांचा निशाणा

News Desk