HW Marathi
देश / विदेश राजकारण

काँग्रेस अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरु

अखिल भारतीय काँग्रेस कमेटीची बैठक आज राजधानी दिल्लीत झाली. यावेळी पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडण्याची कोंडी फोडण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.ही बैठक संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चार वाजता सुरू होणारी बैठक रात्री नऊपर्यंत चालणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडीच्या चर्चेत माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सहभागी झाले नाहीत. पक्षाच्या सर्वोच्च अशा या कार्यकारी समितीच्या आज झालेल्या बैठकीत ते उपस्थित होते. मात्र जेव्हा पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यावर चर्चा सुरु झाती तेव्हा ते निघून गेले

काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गेहलोत, सुशीलकुमार शिंदेंसह अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

2019 साली लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पराभवाची जबाबदारी स्विकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पक्षाच्या अनेक नेत्यांनी समजविण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाही आणि काँग्रेस अध्यक्ष न होण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते.

 

Related posts

“जान भी है और जहान  भी है”, पंतप्रधानांनी दिले सर्व मुख्यमंत्र्यांना लढण्याचे बळ

News Desk

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने करणार सन्मानित

News Desk

बीएसएफचे दहा जवान बेपत्ता

News Desk