HW News Marathi
देश / विदेश

ऑनलाईन सट्टा कंपनीच्या संचालकाला सायबर पोलिसांकडून अटक

मुंबई | शहरात अनेक ठिकाणी ‘गेम किंग इंडिया’ या नावाने ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या कंपनीच्या संचालकाला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ सालापासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या शहरातल्या पोलीस स्टेशनमध्ये एकूण १९ गुन्हे दाखल झाले आहे. ‘गेम किंग इंडिया’ कंपनीच्या दोन संकेतस्थळांना पोलिसांनी बंद देखील केले आहे. सदरच्या वेबाईटच्या दोन्ही संकेतस्थळांना बंद करण्यासाठी पोलिसांनी केंद्र सरकारची परवानगी घेऊनच ती बंद केल्याचे सायबर विभागाचे अकबर पठाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सदरच्या गुन्ह्यात आतापर्यंत गेम किंग इंडिया कंपनीचा संचालक,स्टॉल चालक यांच्यासह ९ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये आरोपी आचल चौरसिया आणि रमेश चौरसिया हे मुख्य आरोपी असून त्यांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. संकेतस्थळावर गेम खेळण्याच्या नादात भेट देणाऱ्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत असल्याचे प्रकार पोलिसांना कळत होते. गुप्त बातमीदाराच्या साहाय्याने पोलिसांनी आपली वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना पकडण्यासाठी तैनात केली होती अखेर कंपनीचे संचालक आणि त्याची सहकारी यांना गुरुग्राम आणि हरियाणा मधून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या एका तपास पथकाने सदर आरोपींना गुरुग्राम आणि हरियाणा मधून अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असून आरोपींना ५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नकारात्मक क्रूड तेलाच्या किमतीचा अर्थ म्हणजे भारतीय ग्राहक इंधनासाठी कमी पैसे देतात का?

News Desk

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही | सामना

News Desk

बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा

Aprna